धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील अटक आरोपी विनोद पिटू गंगणे यांची तब्येत बिघडली असुन त्यांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंगणे हे 12 जुन पर्यंत पोलीस कोठडीत असुन त्या दरम्यान त्यांची तब्येत बिघडली आहे, त्यांना पोटदुखीचा त्रास होत आहे, उपचार सुरु आहेत.
विनोद गंगणे याला 6 जुन रोजी अटक केल्यानंतर 9 जुन सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती, ती संपल्यावर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर पुन्हा 3 दिवसांची 12 जुन पर्यंत कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीत असताना त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने पोलीस तपासात खंड पडणार आहे, गंगणे यांचे 2 मोबाईल गहाळ असुन त्याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद असुन ते गहाळ मोबाईल शोधणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. गहाळ मोबाईलमध्ये अनेक गुपिते असुन शकतात.
गंगणे यांचा जामीन अर्ज व रिमांड वेळी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तुम्हाला आरोपीला वाचवायचे आहे का? राजकीय दबाव आहे का? राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असल्याने दबाव आहे का? पुरावे होते तर गंगणे यांना सेवन गटात का सहभागी केले असे अनेक प्रश्न केले त्यावर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर व इतर अधिकारी निरूतरीत झाले.