Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

तुळजापुर शहराच्या विकासाला प्राधान्य, मांडल्या संकल्पना – महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर 

समय सारथी by समय सारथी
November 29, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
182
VIEWS

तुळजापूर – समय सारथी

तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार असे सांगत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांनी विकासाच्या संकल्पना मांडल्या. तुळजापूर शहराच्या शैक्षणिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विकासासाठी सर्वंकष संकल्पना मांडत शहराच्या प्रगतीसाठी ठोस दिशा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. 

तुळजापूर शहरातील विविध समस्या, नागरिकांच्या गरजा आणि भावी पिढीचा विकास या सर्व बाबी विचारात घेऊन प्रमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प मांडण्यात आला. स्वच्छता व मूलभूत नागरी सुविधांचा विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातील सर्व भागांमध्ये स्वच्छतेचा ऑडिट घेऊन त्यानुसार नियोजन,प्रत्येक परिसरात स्वतंत्र स्वच्छता पथकांची निर्मिती,महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृहांची उभारणी,घनकचरा व्यवस्थापनासाठी शास्त्रनिष्ठ उपाययोजना,ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइन संदर्भातील तातडीचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.

शहरी उद्याने, क्रीडांगण आणि खेळ सुविधा,विद्यमान उद्यानांचे पुनर्निर्माण आणि नव्या उद्यानांची उभारणी,विद्यार्थ्यांसाठी व तरुणांसाठी खेळाच्या मैदानांचे विकासकाम,शहराच्या इतिहासाशी निगडीत ठिकाणी (जसे छत्रपती संभाजी महाराज उद्यान) ऐतिहासिक छटा देऊन आकर्षक स्थळांची निर्मिती, शारीरिक विकासासाठी सर्व वयोगटांसाठी स्वतंत्र व्यायामसुविधा करणार आहेत.

गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणाची निर्मिती, शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि स्पर्धात्मक वातावरण,नगरपालिकेच्या शाळांमध्ये नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण,विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि सृजनशीलतेला चालना देणारे कार्यक्रम,आधुनिक सीबीएसई पद्धतीला अनुरूप शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.

सांस्कृतिक विकास व नव्या तुळजापूरची ओळख कायम ठेवली जाईल.विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत आणि कलेला प्रोत्साहन,तुळजाभवानी मंदिर परिसरातील सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक पायाभूत सुविधा, तुळजाभवानी देवीच्या मागील इतिहास, परंपरा आणि महिमा यांची विस्तृतपणे माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष योजना,समाजातील कलावंतांना प्रोत्साहन देऊन शहराच्या सांस्कृतिक वारशाचा विस्तार केला जाईल.

धार्मिक पर्यटन व यात्रेकरू सुविधांचा विकास,देवीदर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी उन्नत पायाभूत सुविधा,पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रामव्यवस्था आणि आरोग्य सुविधा सर्व मंडपांमध्ये उपलब्ध करणे.नवरात्र आणि इतर यात्रांदरम्यान ट्रॅफिक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन.भाविक महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुविधा आणि नियंत्रण कक्ष.

भविष्यातील सामाजिक विकासात नेतृत्त्वाची भूमिका असणार आहे.शहराच्या भौतिक विकासाबरोबरच सामाजिक विकासाला तितकाच महत्व,युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण आणि स्थानिक रोजगार निर्मिती, शहरी प्रशासन, नागरिक संस्था, स्वयंसेवी संघटनांसोबत समन्वय साधून सर्वांगीण प्रगती साधली जाईल.

शहरातील पुजारी बांधवांसाठी मंदिर व्यवस्थापनात तटस्थ, समन्वयक आणि जनसंपर्काच्या माध्यमातून सौहार्द टिकविण्यासाठी प्रयत्न, पुजारी बांधवांच्या अडचणी, मागण्या आणि परंपरांची जपणूक करण्यासाठी सकारात्मक संवाद.शहरातील युवकांसाठीकौशल्यविकास प्रशिक्षण,रोजगार निर्मितीमध्ये सक्रिय प्रयत्न,स्टार्टअप, उद्योग आणि स्व-रोजगार प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाईल.

तुळजापूर शहराच्या भविष्यकालीन विकासासाठी एक व्यापक, सर्वसमावेशक आणि सर्व स्तरांवर बदल घडविणारी योजना मांडली असून शहराचे आधुनिकीकरण, सांस्कृतिक ओळख जपणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता या सर्वांचा समतोल साधण्याचा ठोस संकल्प यामध्ये दिसून येतो.

Previous Post

सुप्रीम कोर्टाचे आदेश – कै पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाची पुन्हा एकदा नवीन ‘डेडलाईन’ – जैन याची याचिका, 27 मार्च पुर्वी निकाल द्या

Next Post

शपथपत्र – ड्रग्ज, गांजा विकणार नाही, जुगार मटकातुन पैसा कमावणार नाही – तुळजापुरमधील उमेदवाराचा 100 रुपयांचा नोटरी बॉण्ड व्हायरल 

Related Posts

महाराष्ट्र

काँग्रेसचे 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर – निर्णय, आज 2 जणांचा पक्ष प्रवेश

April 9, 2026
महाराष्ट्र

विकास कामांचा आढावा – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक घेणार मुंबईत बैठक

April 8, 2026
महाराष्ट्र

तणाव – गॅस वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरु, धाराशिव जिल्ह्यातील घटना 

April 8, 2026
महाराष्ट्र

गाळ्यांचा पुनर्लिलाव, सुविधा व सुरक्षेचा प्रश्न – धाराशिव नगर परिषदेचे दुर्लक्ष, करार संपुन 25 वर्ष – ठोस निर्णय कधी ?

April 8, 2026
महाराष्ट्र

जिल्हा नियोजन समिती – प्रशासकीय मान्यता व निधी वितरणात अनियमीतता, आमदार कैलास पाटील

April 8, 2026
महाराष्ट्र

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार व अट्रॉसिटी – आरोपीचा जामीन मंजूर, धाराशिव कोर्टाचा निर्णय

April 7, 2026
Next Post

शपथपत्र - ड्रग्ज, गांजा विकणार नाही, जुगार मटकातुन पैसा कमावणार नाही - तुळजापुरमधील उमेदवाराचा 100 रुपयांचा नोटरी बॉण्ड व्हायरल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

काँग्रेसचे 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर – निर्णय, आज 2 जणांचा पक्ष प्रवेश

April 9, 2026

विकास कामांचा आढावा – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक घेणार मुंबईत बैठक

April 8, 2026

तणाव – गॅस वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरु, धाराशिव जिल्ह्यातील घटना 

April 8, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp