धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी पिट्टा सुर्वे या आरोपीला सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचे सोलापूर रॅकेट उघड होण्याची शक्यता असुन आरोपींची संख्या 38 वर गेली आहे. पिट्टा सुर्वे हा पोलिसांना हवा असलेला आरोपी होता, त्याचा शोध गेली काही दिवसापासुन सुरु होता. आरोपीला आज कोर्टात हजर केले जाऊ शकते.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी धाराशिव बैठकीत ड्रग्ज प्रकरणाचा आढावा घेत तपास करावा असे निर्देश दिले. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पिट्टा सुर्वे व मुंबई येथील अतुल अग्रवाल यांची नावे पोलिसांकडे आरोपी व साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबात असल्याचे म्हणटले होते, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.
ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या आता 38 झाली असुन 21 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची यानिमित्ताने शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली असुन 6 आरोपींचे अर्ज प्रलंबित आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (16) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 16 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत