Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज प्रकरण – माजी उपसभापती शरद जमदाडे अटकेत, सेवन गटातील पहिला आरोपी जाळ्यात – 7 आरोपींचे जामीन अर्ज प्रलंबित

समय सारथी by समय सारथी
May 18, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
2.3k
VIEWS

धाराशिव – समय सारथी

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली असुन ते सेवन गटातील फरार आरोपी होते, त्यांना कामठा येथून अटक करण्यात आली असुन 17 मे रोजी धाराशिव कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी कांडात प्रथमच सेवन गटातील आरोपीला अटक केली आहे त्यामुळे पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे. आजवर तस्कर गटातील अटक आरोपीना कोर्टाने थेट 14 दिवसांची कोठडी दिली होती तर अटकेतील 6 व फरार 3 अश्या 9 आरोपींना जामीन नाकारला आहे. सेवन गटात काय होते याची काही जन वाट पाहत आहेत त्यावरून पुढील घडामोडी घडणार आहेत. पोलिस व सरकारी वकील यांची कोर्टातील भुमिका व बाजु यात महत्वाची ठरणार आहे. सर्व आरोपीचे ड्रग्ज तस्करांसोबत थेट आर्थिक व्यवहार, संभाषणासह इतर पुरावे तपासात सापडले आहेत. जमदाडे हे भाजपमध्ये असुन ते तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत.

धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सध्या 7 आरोपीचे जामीन अर्ज प्रलंबित असुन त्यात 5 जन फरार आहेत तर 2 आरोपी जेलमध्ये आहेत. सेवन गटातील फरार आरोपी विशाल सोंजी व अभिजीत अमृतराव या दोघांसह तस्कर गटातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर व नानासाहेब कुऱ्हाडे अश्या 4 जणांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 20 व 21 मे रोजी सुनावणी होणार आहे तर धाराशिव जेलमध्ये असलेले ड्रग्ज तस्कर गटातील सुलतान उर्फ टिपू शेख व राहुल कदम परमेश्वर या 2 जणांच्या अर्जासह इतर अटक आरोपींची नियमित सुनावणी 20 व 21मे रोजी होणार आहे तर सेवन गटातील जगदीश जीवन कदम पाटील यांनी अटकपुर्व जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 23 मे रोजी सुनावणी होणार आहे. 

तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 16 जणांना अटक केली असुन 20 जन फरार आहेत. 36 पैकी 15 तस्कर व 1 सेवन गटातील आरोपी अटक असुन तस्कर गटातील 26 पैकी 11 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 9 आरोपी फरार आहेत. अटकेतील 16 पैकी 15 तस्कर जेलमध्ये आहेत, सेवन गटातील 1 अटकेत आहे. धाराशिव पोलिसांनी कोर्टात 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र दाखल केले आहेत त्यात 26 जणांवर ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे तर 10 जण सेवन गटात आहेत त्यात माजी सभापती शरद जमदाडे हे आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. 

फरार आरोपी (20) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 20 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सेवन गट (10 आरोपी) – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी उपसभापती शरद रामकृष्ण जमदाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत, हे विशेष.

अशी झाली अटक (16) – तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली, त्यानंतर 15 एप्रिलला कोर्टात चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना 36 वा आरोपी करण्यात आले. तस्कर गटातील रणजीत रंगनाथ पाटील यांना 1 मे रोजी अटक केली त्यानंतर 16 मे रोजी माजी उपसभापती शरद जमदाडे यांना अटक केली. 17 मे रोजी आबासाहेब पवार याला पुणे येथून अटक केली.

Previous Post

अवैध अनधिकृत विना परवाना खत साठा, धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद

Next Post

पोलिस कोठडी – ड्रग्ज गुन्ह्यात शरद जमदाडे अटकेत, कोर्टाकडुन दिलासा नाही – जोरदार युक्तिवाद, सेवन गटात खळबळ

Related Posts

महाराष्ट्र

षडयंत्र – ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र, अफ़वा – स्पष्टीकरण

April 10, 2026
महाराष्ट्र

दावा – ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

April 10, 2026
महाराष्ट्र

कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण – पंचसूत्रीतुन समाज परिवर्तनावर भर

April 9, 2026
महाराष्ट्र

भुमीपुजन – तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामे मे महिन्यात सुरुवात होणार – पालकमंत्री प्रताप सरनाईक

April 9, 2026
महाराष्ट्र

काँग्रेसला धक्का, 2 नगरसेवकांचा भाजप पक्ष प्रवेश – धाराशिव नगर परिषदेत फोडाफोडी, गटबाजी, सत्तेचे समीकरण

April 9, 2026
महाराष्ट्र

आरोग्य मंत्री आबिटकर व पाटील धाराशिव जिल्ह्यात – शिवसेनेची बैठक, पक्ष संघटन

April 9, 2026
Next Post

पोलिस कोठडी - ड्रग्ज गुन्ह्यात शरद जमदाडे अटकेत, कोर्टाकडुन दिलासा नाही - जोरदार युक्तिवाद, सेवन गटात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

षडयंत्र – ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा म्हणजे राजकीय षडयंत्र, अफ़वा – स्पष्टीकरण

April 10, 2026

दावा – ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

April 10, 2026

कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण – पंचसूत्रीतुन समाज परिवर्तनावर भर

April 9, 2026
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp