धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आणखी 1 आरोपी निष्पन्न झाला असुन त्याच्या आर्थिक व्यवहाराचे पुरावे समोर आले आहेत. तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात ही माहिती दिली. तपासाच्या अनुषंगाने आरोपीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले असुन त्याने 70 हजार रुपयांचे व्यवहार केले आहेत. ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु असुन आणखी 2 ते 3 आरोपी होऊ शकतात शिवाय काही जन रडारवर असल्याची माहिती आहे. जवळपास 80 पेक्षा जास्त जणांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत, त्याचे काय झाले हे गुलदस्त्यात आहे.
ड्रग्ज गुन्ह्यात आजवर 37 जणांना आरोपी केले असुन 20 आरोपी अटकेत तर 17 फरार आहेत. 17 तस्कर व 3 सेवन गटातील असे 20 आरोपी अटकेत आहेत. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 7 आरोपी फरार आहेत.पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (17) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 17 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.