धाराशिव – समय सारथी
तुळजापुरात पुन्हा एकदा गुंडाराज वाढले असुन एका फिर्यादीला कानशीलावर पिस्तुल दाखवून मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे मारहाण केल्यावर लघुशंका करुन तोंडावर थुंकले गेले. गणेश रोचकरी,लखन भोसले,विश्वजीत अमृतराव, सुशांत सपाटे व अन्य दोन जणांनी हे कृत्य केले अशी तक्रार दिल्याने तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व आरोपी फरार आहेत.
तूळजापूर शहरातील हाडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारी मैदानातफिर्यादी गोरख भागवत पारधे यांना आरोपींनी तु आमच्या समोर पांढरे कपडे घालून फिरतो का असे म्हणून दहशत निर्माण करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, बियरची बाटलीने मारहान करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे समोर पिस्तुलच्या वरचा भाग खाली वर करुन कॉक करुन कानशिलावर लावून जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीचे तोंडावर लघुशंका करुन सुपारी खावून तोंडावर थुंकली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार फिर्यादी गोरख पारधे यांनी दिली.
तुळजापूर पोलिस ठाण्यात कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506, भा.दं.वि.सं.3(1) (ए), 3(1) (आर), 3 (1) (एस), 3(2)(व्हि), 3(2) (व्हि) (ए) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.