धाराशिव – समय सारथी
प्रेमात धोका दिल्याने एका तरुणाने मोबाईलवर स्टेट्स ठेवल्याने अमानुष बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे घडली असुन 3 आरोपी विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यात सांगवी मार्डी येथील योगेश काळे (कोळी) या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असुन गावातील रोहित बागल, काक्रबा येथील चेतन माने, तुळजापूर सत्यवान चादरे या 3 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(3),118(1),352,351(1),3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे, मारहाण पाहता त्याची गंभीरता कळते.
योगेश काळे याचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते, त्यांचा साखरपुडा झाला होता मात्र तिने प्रेमात धोका दिल्याने योगेशने मोबाईलवर स्टेट्स ठेवले त्याचा राग तरुणाला आला त्यानंतर ते योगेशच्या घरी आले व स्टेट्स का ठेवले म्हणुन शिवीगाळ केली व कट रचून त्याचे गाडीत बसवून अपहरण करीत जबर मारहाण केली. तरुणाच्या डोळ्यावर तोंडावर व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असुन त्याच्यावर धाराशिव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत