तुळजापूर – समय सारथी
तुळजाभवानी शिखर (गाभारा) पाडण्यास पुजारी व भाविकांनी विरोध दर्शवला असुन श्री तुळजाभवानी मंदिरात झालेली शस्त्र पूजनचे शस्त्र (तलवार) म्हाळ झाल्याचा आरोप केला आहे. मंदिर परिसरामध्ये अनधिकृत पुजाऱ्याकडून वारंवार होणारी भाविकांची फसवणूक, ब्रह्मदेवाच्या मूर्ती विटंबणेस जवाबदार व्यक्तीवर कार्यवाही करावी यासह भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे (लाडू) दर कमी करण्यात यावे या मागण्यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भोपे पुजारी मंडळ या मागण्यासाठी आक्रमक झाले असुन महंत, पुजारी, भाविक, व्यापारी यांच्यासह आंदोलन केले.
पुरातन विभागाचे नियम डावलून मंदिरचा जिर्णोद्धार सुरु असल्याचा आरोप केला आहे. तुळजाभवानी मातेच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी असलेल्या मंदिराचा गाभारा व शिखर पाडून नव्याने मोठ्या प्रमाणात बदल करून बांधण्यात येणार असल्याचे सांगत त्याला भोपे पुजारी मंडळाने विरोध केला आहे.
मंदिरातील सर्व उपदेवता स्थलांतर करतेवेळी ब्रह्मदेवताची अति प्राचीन मुर्ती व्यवस्थापन समितीच्या निष्काळजीपणामुळे दुभंगली गेली, या प्रकरणाची सखोल चौकशी होवून जबाबदार व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. बोगस पुजारी ओळखून त्यांचा कायमचा बंदोबस्त करून देविभक्तांना होणा-या फसवणूकीपासून वाचवावे.
पद्मश्री गणेशजी द्रविड शास्त्री यांनी देवीसमोर तलवार ठेवून मंत्रोपचाराने देवीच्या आठ हातातील शस्त्रांचे तत्व शक्ती त्यात काढून मंदिरचा जिर्णोद्धार व बोललेला संकल्प पुर्ण होईपर्यंत देवीजवळ ती तलवार ठेवली जावी अशा विविध मागण्याचे निवेदन मंदिरचे धार्मिक सहायक व्यवस्थापक अमोल भोसले यांना देण्यात आले.
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम,महंत इच्छागिरी महाराज,महंत अरण्यबुवा महाराज,धिरज पाटिल,परिक्षित साळुंके,किरण यादव,सिद्धिराज कदम,अमोल कुतवळ,प्रसाद मलबा,संकेत पाटिल,अतुल मलबा,
सुधिर कदम,विकास मलबा,सचिन कदम,विराज मलबा,प्रशांत सोंजी,सार्थक मलबा,रूपेश भैय्ये,
अक्षय कदम,नानासाहेब कदम,स्वराज कदम,दिनेश कदम,कैलास कदम,सचिन पाटिल,अभिषेक कदम,
यश कदम,संदिप कदम,रोहित कदम,पंकज पाटील
शुभम कदम,योगेश कदम,अमित कदम,सह अनेक भोपे पुजारी या धरणे आंदोलनात सहभागी होते.