तुळजापूर – समय सारथी
श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीचा गाभारा संवर्धनासाठी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. देवीच्या गर्भगृहातील मूळ भिंतीवरील मार्बल व त्याखालील फरशी काढल्यानंतर गाभाऱ्याच्या छताचे बॅलेन्स सांभाळनाऱ्या (बीम कॉलम) दगडांना तडे गेल्याचे आढळून येत आहे तसेच गाभाऱ्यातील भिंत म्हणावी तेवढी मजबुत दिसत नाही.सध्या वारंवार भुगर्भातून गुढ आवाज होत असून, जमिन हादरत आहे. हे सर्व देवीच्या मुर्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार धोकादायक आहे .सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी मूळ गाभाऱ्याचा स्वरूप देत धार्मिक रूढी परंपरा जपत 30 × 30 चा प्रशस्त नवीन गाभारा निर्मिती करावा म्हणजे पुढील शेकडो वर्षाच्या वाढत्या भाविक भक्तांच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. त्यामुळे तुळजापुर शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत वाकोजी बुवा गुरू तुकोजी बुवा, महंत माऊजीनाथ महाराज पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके,माजी अध्यक्ष किशोर दादा गंगणे,संचालक शिवाजी बोधले, इंद्रजित साळुंके यांच्या हस्ते राबवण्यात आली.सगळ्यांनी आपले मत व्यक्त केले व या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून आपला सहभाग घेतला.यावेळी आयोजक बाळासाहेब भोसले, सागर इंगळे,मयूर कदम तुळजापूर शहरातील पुजारी,व्यापारी,सेवेदारी ज्येष्ठ नागरीक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.