धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गोंधळ घालत हाणामारी करणे 10 भाविकांना चांगलेच भोवले असुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करून 2 वर्ष मंदीर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रथमच गोंधळ घालणाऱ्या भाविकांवर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या गोंधळचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थाने तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद केला. भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 125 कलम 194(2) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 अंतर्गत 135 नुसार गुन्हा नोंद केला तसेच 10 भाविकांना दोन वर्ष प्रवेश बंदी केली आहे.
मच्छिंद्र वाळज ,कृष्णन तागुंदे, स्वप्निल लांडे ,निल बेडभर, ऋषिकेश मिसाळ, सोहेल कांबळे, शिवाजी माने, अभिषेक शिंदे, पांडुरंग वाघमारे ,संकेत पानसरे अशी भाविकांची नावे आहेत. चैत्र यात्रेत मंदिराच्या कट्ट्यावर नारळ फुल पूजेचे साहित्य एकमेकांवर फेकत गोंधळ घातला व हाणामारी केली.











