धाराशिव – समय सारथी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील 7 पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असुन धाराशिव ग्रामीण,धाराशिव शहर, भुम, आर्थिक गुन्हे शाखेला नवीन पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी याबाबतचे आदेश काढले असुन काही बदल्या या मुदतपूर्व असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांची मान्यता घेण्यात आली आहे.
लाच प्रकरणात निलंबित झालेले ग्रामीण पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके यांचा बदलीचा विनंती अर्ज अमान्य करण्यात आला असून, ते पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथे कायम आहेत. शेळके यांची खाते अंतर्गत चौकशी सुरु आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद चंदरराव सुर्यवंशी भुम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची बदली प्रभारी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा धाराशिव येथे करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक आमोद रामचंद्र भुजबळ सध्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण, यांची बदली पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शेख शकील शेख प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव शहर, यांची बदली पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), धाराशिव येथे तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनिष मोहन पाटील यांची प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) धाराशिव येथून प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव ग्रामीण येथे तात्पुरत्या स्वरुपात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कुमार भगवान दराडे यांची प्रभारी अधिकारी, तात्पुरत्या स्वरुपात जिविशा, धाराशिव येथून प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, धाराशिव शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.