धाराशिव – समय सारथी
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटणार असुन प्रथम बॉयलर अग्नीप्रदिपन कार्यक्रम 21 ऑक्टोबर रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ समूहाने हा कारखाना भाडेतत्वावर घेतला आहे. चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भैरवनाथ शुगर वर्क्सचे हे 6 वे युनिट असुन या कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन व्हॉइस चेअरमन अनिल सावंत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केले आहे.
तेरणा पट्ट्यात या साखर कारखान्याचे मोठे महत्व असुन गेली अनेक वर्ष हा साखर कारखाना बंद पडला होता, तो आता सुरु होणार असल्याने शेतकरी, सभासद व कामगार यांना दिलासा मिळाला आहे.












