धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील सीए व कर सल्लागार यांच्या असोसिएशनची मीटिंग 27 जून 2025 रोजी पार पडली, या बैठकीमध्ये पुढील दोन वर्षासाठीचे पदाधिकाऱ्यांची निवड ही बिनविरोध झाली संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून सीए महेश मिनियार, उपाध्यक्ष म्हणून कळंब येथील शिराज शेख व उमरगा येथील राहुल मोरे यांची सचिव म्हणून कर सल्लागार अमोल अण्णाप्पा लोहार तर कोषाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट ललित चौधरी यांची निवड करण्यात आली
सदरील बैठकीसाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ सीनियर सीए व कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनला नवीन उंचावर नेण्यासाठी नवीन कार्यकारणी कटिबद्ध असेल असा नवीन कार्यकारिणीचा माणस आहे.