धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे तलाठी भरती परीक्षाचा घोटाळा उघड झाला असुन संगणक हॅक करुन पेपर सोडावीला गेला, याप्रकरणी चौकशी केल्यानंतर हा घोटाळा समोर आला असुन पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 17 ऑगस्ट 23 ते 14 सप्टेंबर 2023 या काळात परीक्षा झाली त्याचा निकाल 24 जानेवारी 2024 ला लागला त्यात 2 जणांनी घोटाळा केला.
ऑनलाईन संगणक हॅक करुन पेपर सोडविण्यात आला, घोटाळा घालण्यासाठी नवीन पद्धत अवलंभन्याय आली, 2 परीक्षार्थी यांनी पेपर सोडवताना उत्तरे सोडविली नाहीत, त्यानंतर एक माउस कर्सर जिथे येईल त्याला टीक केले अश्या पद्धतीने घोटाळा घालण्यात आला.
35 लाख दिले तर सेटिंग करेल असे लातूर येथील एकाने सांगितले त्यानंतर 2 परीक्षार्थी 27 लाख देतो असे सांगितल्यावर हॅकिंग करण्याचे ठरले. लातूर येथील एका सेंटर चालकाने याची योजना तयार केली व ऑनलाईन पेपर सोडवून दिला. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अश्या प्रकारचा घोटाळा उघड झाला आहे. महसूल विभागाच्या अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.