धाराशिव – समय सारथी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असुन त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वीरेन्द्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके व महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांचेवर आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं 235/2025 कलम 7, 7 (अ), 12 भ्रष्टाचार अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्यांना 27 जुन 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे.