धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही आरक्षण नाही या नैराशातून धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी येथील 24 वर्षीय परमेश्वर राजेंद्र मिसाळ या तरुणांने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली.
परमेश्वर यांनी आत्महत्या करण्यापुर्वी त्यांची व्यथा व संघर्ष चिट्ठीत मांडला आहे. मी रोज खुप काम करतो, शेती करतो पण भाव मिळत नाही सगळं कस भागवायचं. मी आरक्षणासाठी बीडला गेलो, धाराशिवला गेलो, अंतरवली सराटीला गेलो,जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईला गेलो पण शिंदे सायबानी (मुख्यमंत्री यांना उद्देशून) कोणताच निर्णय घेतला नाही.किती आंदोलन करायची, जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार आहेत.सरकारने आरक्षण द्यावे, सगळ्यांनी जरांगे पाटील यांची साथ द्यावी ही विनंती. भय्या सगळ्यांची काळजी घे, भय्या आकू वहिनी बाय तुम्ही सगळीजण मला माफ करा, चांगले रहा.