भूम तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांत सहभागी, शिवधनुष्य हाती
परंडा – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी परंडा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे, शिवसेना पक्षात सावंत यांच्या हस्ते भूम तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांत सहभागी होत प्रवेश केला, या कार्यकर्ते यांनी भगवा खांद्यावर घेत शिवधनुष्य हाती घेत विजयाचा संकल्प केला.
विधानसभेच्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात भैरवनाथ सुगर वर्क्स सोनारी येथे भुम तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधीकारी व कार्याकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला भुम तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कामावर विश्वास ठेवुन भुम तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा भगवा देऊन सत्कार केला.
हरिदास नारायण सावंत माजी सरपंच वालवड, बाळासाहेब खोसे, नवलगाव येथून उबाठा गटातील युवराज लोंढे सचिन लोंढे, लहू गायकवाड, अधिकराव टकले, दादा ढगे, दयानंद भगत, अबी येथून सरपंच विठ्ठलराव वाघमारे, उबाठा गटाचे गणेश सानप, श्रीकांत शेळके, राष्ट्रवादीचे माजी सरपंच प्रकाश वराळे, उबाठाचे नवनाथ, शेळके रघुनाथ वराळे, राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच रामा वराळे, भाजपाचे बाळासाहेब सानप, राष्ट्रवादीचे सुरेश वराळे, सुग्रीव वराळे, कैलास वरळे, बिरदेव वराळे, अमोल सानप आदींनी शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची मतदार संघात मोठी ताकद वाढल्याचे पहावयास मिळत आहे.