धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 26 सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता धाराशिव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह धाराशीवकडे प्रयाण.सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.सोयीनुसार राखीव.दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत अनौपचारिक बैठक.दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद.दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूरकडे प्रयाण.सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे तुळजापूर पुनर्विकास व तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील.सायंकाळी 7 वाजता श्री तुळजाभवानी दर्शन व अभिषेक.रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह धाराशिवकडे प्रयाण व रात्री 8.30 वाजता विश्रामगृह येथे आगमन व रात्री 11.35 वाजता लातूर एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करतील.