धाराशिव – समय सारथी
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने त्यांची 20 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली, त्यात धाराशिव कळंब जागेची घोषणा न झाल्याने पेच कायम आहे. धाराशिव कळंब जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटली असुन उमेदवारीवर एकमत होत नसल्याने पेच कायम आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यावर सर्व अवलंभून आहे. शिवसेनेकडुन सुधीर पाटील, धनंजय सावंत, केशव सावंत, सुरज साळुंके, शिवाजी कापसे, संदीप मडके यासह अन्य इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे, ते सोमवारी शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढत अर्ज भरणार आहेत.
दुसरीकडे उमरगा येथे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही तर महायुतीकडुन शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी दिली आहे.