धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे उबाठा गटाचे खासदार ओमराजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांची पुणे येथील मोदीबाग येथे भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आभार व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील ही भेट महत्वाची आहे.
धाराशिव लोकसभेतील सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला विक्रमी मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेत मोठ्या अपेक्षा असुन निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून या भेटीकडे पाहिले जाते.