कळंब – समय सारथी
धाराशिव पोलिसांनी कळंब तालुक्यातील वाठवडा येथे एका लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. स्वतःचे अर्थिक फायद्यासाठी 2 पिडीत महीलाकडुन आरोपी वेश्या व्यवसाय करवून घेत होते, याप्रकरणी पोलिसांना 4 आरोपीना अटक केली असुन शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाठवडा येथील निसर्ग लॉज येथे हा वेश्याव्यवसाय राजरोसपणे सुरु होता, याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी ग्राहक पाठवून छापा टाकला. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, सपोनि कोळेकर, पोउपनि पवार, परि पोउपनि तांबडे यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी कलम 143,144,3 (5) BNS सह कलम 3,4,5,6 अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सपोनि धरणीधर बाबा कोळेकर यांनी तक्रार दिल्याने शिराढोण पोलिसात 4 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तय्यून तय्यब बेग वय 24 वर्ष रा. वाठवडा, तय्यब शबीर बेग वय 51वर्ष रा. वाठवडा. कळंब, दलाल खयुम शबीर बेग वय 48 वर्ष व नरेंद्र शरद शिंदे वय 37 वर्षे रा. दत्तनगर मूरूड ता.जि. लातुर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी 34 वर्षीय नालासोपारा येथील व 28 वर्षे महिला मुरुड लातुर अशा 2 महिलांची सुटका केली आहे. स्वतःच्या अर्थिक फायद्या करिता, अमिष दाखुन वेश्याव्यवसाय करुन घेत होते.