धाराशिव – समय सारथी
मुखपत्र म्हणुन ओळख असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात शिवसेना उबाठा गटाच्या 64 उमेदवार यांची यादी जाहीर करण्यात आली असुन त्यातून परंडा येथून रणजित ज्ञानेश्वर पाटील याचे नाव वगळले आहे. मध्यवर्ती कार्यालय येथून 65 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात पाटील यांचे नाव होते मात्र मुखपत्रात टे नाही, यादी जाहीर झाल्यावर त्यात काही बदल होतील असे संजय राऊत यांनी सांगितले होते यानुसार नाव नाही, विशेष म्हणजे सामनाच्या हेडीग मध्ये 65 उमेदवार असा उल्लेख आहे मात्र 64 जणांची यादी फोटोसह आहे. सामनाने संभ्रम दुर केला असुन भुम परंडा वाशी येथून राहुल मोटे हे राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात महाविकास आघाडीकडुन उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावाची आज घोषणा होऊ शकते.
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत अजूनही संभ्रम व गोंधळ काल रात्री यादी जाहीर झाल्यावर निर्माण झाला. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने राज्यातील 65 उमेदवार यांची यादी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी जाहीर केली त्यात परंडा मतदार संघातून राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. नावात चुक झाली. राहुल ज्ञानेश्वर पाटील असे नाव परंडा मतदार संघात घोषित केले. राहुल ऐवजी रणजित ज्ञानेश्वर पाटील असे आहे असे म्हणत शिवसेना उबाठा गटाने आनंद उत्सव साजरा केला होता तर राहुल मोटे यांनी त्यांच्या कार्यकर्ते यांना सबुरीचा सल्ला दिला.
परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती. जिल्ह्याच्या आजवरच्या राजकारणात विधानसभा निवडणुकी सर्वाधिक 1 लाख 6 हजार 674 मते घेण्याचा विक्रम डॉ सावंत यांच्या नावावर आहे