लोकसभेत ही उभे होते 2 रवींद्र विश्वनाथ गायकवाड व पद्मसिंह पाटील नावाचे उमेदवार
धाराशिव – समय सारथी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 66 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 23, परंडा 21, उस्मानाबाद कळंब 12 व उमरगा येथे 10 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत एक सारखीच नावे व आडनावे असलेले उमेदवार उभे करुन मतदार यांना चकवा देण्याचा डाव सुद्धा या टाकण्यात आला आहे मात्र तो कितपत यशस्वी होते हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. आजवरचा सारख्या नावाचा निवडणुकीतील इतिहास पाहिला तर हा डाव 2009 च्या लोकसभेला पहिल्यांदा टाकण्यात आला मात्र तो फेलच गेला आहे, कारण पब्लिक हे ये सब जनती है असंच म्हणावं लागेल.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 2 धीरज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, महाविकास आघाडी काँग्रेसकडुन ऍड धीरज पाटील तर आदर्श संग्राम पार्टीकडुन धीरज पंडीत पाटील हे रिंगणात आहेत. काँग्रेसच्या धीरज पाटील यांचे चिन्ह हात आहे तर आदर्श पार्टीच्या धीरज पाटील यांचे लिफाफा हे चिन्ह आहे. उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघात नितीन गजेंद्र काळे अपक्ष असुन भेंडी हे चिन्ह आहे तर विक्रम रघु काळे हे अपक्ष उमेदवार असुन विजेचा खांब हे त्यांचे चिन्ह आहे त्यामुळे इथे कोणाला शॉक बसणार हे पाहावे लागेल. भुम परंडा मतदार संघात 2 राहुल मोटे नावाचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल महारुद्र मोटे असुन त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे तर दुसरे राहुल रामहरी मोटे अपक्ष उभे असुन त्यांचे चिन्ह ग्रामोफोन आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील हे राष्ट्रवादीकडुन उभे होते त्यावेळी पद्मसिंह विजयसिंह मुंडे पाटील नावाचे उमेदवार उभे होते त्यांना केवळ 3 हजार 657 मते पडली होती तर डॉ पाटील हे 6 हजार 787 मतांनी विजयी झाले, सारख्या नावाचा हा जिल्ह्यातील पहिला डाव होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र कहरच झाला, रवींद्र विश्वनाथ गायकवाड व पद्मसिंह पाटील या सारख्या नावाचे 2 उमेदवार उभे राहिले. रवींद्र विश्वनाथ गायकवाड यात नाव, वडिलांचे नाव व आडनाव सारखेच होते. शिवसेनेच्या गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 मते पडली तर अपक्ष गायकवाड यांना 7 हजार 169 मते पडली त्यामुळे हा डाव फसला, त्यावेळी पद्मसिंह पाटील नावाचे 2 उमेदवार होते त्यातील राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते पडली तर अपक्ष पाटील यांना केवळ 3 हजार 361 मते पडली त्यामुळे हाही डाव फेल गेला. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे 2 लाख 34 हजार 325 विक्रमी मतांनी विजयी झाले.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह कंसात पुढीलप्रमाणे कुलदीप धीरज कदम पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात),राणा जगजीतसिंह पाटील,भारतीय जनता पार्टी (कमळ),अण्णासाहेब दराडे,प्रहार जनशक्ती पार्टी-बॅट,शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी,ऑल इंडिया मजलीस ए इन्कीलाब ई मिल्लत, (एअर कंडिशनर),धनंजय मुरलीधर तर्कसे पाटील,राष्ट्रीय समाज पक्ष- (शिट्टी),धीरज पंडित पाटील आदर्श संग्राम पार्टी (लिफाफा),भैयासाहेब नागटिळे,आझाद समाज पार्टी (कांशीराम) किटली, देवानंद रोचकरी, समाजवादी पार्टी (सायकल), शरद पवार,संभाजी ब्रिगेड पार्टी (टिलर), सचिन शेंडगे,जनहित लोकशाही पार्टी (कपाट),डॉ.स्नेहा सोनकाटे,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),अमीर इब्राहिम शेख,अपक्ष (दूरध्वनी ),अमेर सरदार शेख,अपक्ष (संगणक),उज्वला गाटे,अपक्ष (बॅटरी टॉर्च), काकासाहेब राठोड,अपक्ष (अंगठी), योगेश शंकर केदार,अपक्ष (टेबल), तात्या पंढरीनाथ रोडे,अपक्ष (स्नॅपर), दत्तात्रय कदम,अपक्ष (ऑटो रिक्षा), धनाजी हुबे, अपक्ष (स्टम्प्स) अँड.पूजा देडे,अपक्ष (हिरा), मन्सूर अहमद मकसूद शेख,अपक्ष (जहाज),गणेश रोचकरी,अपक्ष (ट्रंपेट), सत्यवान सुरवसे,अपक्ष,द्राक्षे
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी माघार घेतली असून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.यामध्ये अजित पिंगळे, शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण,कैलास घाडगे पाटील, शिवसेना (उबाठा) मशाल, देवदत्त मोरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, (रेल्वे इंजिन), लहू खुणे, बहुजन समाज पार्टी, (हत्ती),प्रणित डिकले,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),डॉ.रमेश बनसोडे, भारतीय जनविकास आघाडी,(ऑटो रिक्षा),सिराज उर्फ पापा सय्यद,टिपू सुलतान पार्टी (किटली),श्रीहरी माळी, राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), अशोक कसबे, अपक्ष (कोट),दत्ता तुपे,अपक्ष (सफरचंद), नितीन काळे,अपक्ष (भेंडी) व विक्रम काळे, अपक्ष (विजेचा खांब)
परांडा विधानसभा मतदारसंघातून 21 उमेदवारांनी माघार घेतली असून 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.यामध्ये निवडणूक लढविणारे उमेदवार,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.प्रा डॉ तानाजीराव सावंत (शिवसेना शिंदे गट) धनुष्यबाण,महादेव लोखंडे,बहुजन समाज पार्टी (हत्ती), राजेंद्र गपाट,महाराष्ट्र नवनिर्माण सेना( रेल्वे इंजिन),राहुल मोटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट (तुतारी वाजवणारा माणूस), आर्यनराजे शिंदे,राष्ट्रीय समाज दल (आर) अंगठी,प्रवीण रणबागुल,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),डॉ.राहुल घुले, राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी),ऍड रेवन भोसले,समाजवादी पार्टी (सायकल), शाहाजहान पैगंबर शेख, बहुजन महापार्टी (हिरा),अरुण जाधवर,अपक्ष (किटली), असिफ जमादार,अपक्ष(गळ्याची टाय), गुरुदास कांबळे,अपक्ष (चपला), जमीलखा पठाण,अपक्ष (ट्रंपेट),दिनेश मांगले,अपक्ष, (ऊस शेतकरी),विनयराज देशमुख,अपक्ष (ऑटो रिक्षा),नुरजहा सोहेल शेख,अपक्ष (प्रेशर कुकर ),बंडू पोळ,अपक्ष (रोड रोलर),राहुल मोटे,अपक्ष (ग्रामोफोन), लक्ष्मीकांत आटूळे,अपक्ष (चिमणी), सोमनाथ कदम,अपक्ष (डंबेल्स) व संभाजी शिंदे,अपक्ष (एअर कंडिशन्स) या उमेदवारांचा समावेश आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 18 उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवाराचे नाव,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे ज्ञानराज चौगुले शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाण, प्रवीण स्वामी शिवसेना (उबाठा) मशाल, सुनंदा रसाळ बहुजन समाज पार्टी (हत्ती), राम गायकवाड वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),शिवप्रसाद काजळे,मराठवाडा मुक्ती मोर्चा (ऑटो रिक्षा), सातलिंग स्वामी, प्रहार जनशक्ती पार्टी ( बॅट ),संदीप कटबु, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रोड रोलर), अजयकुमार देडे,अपक्ष (ट्रंपेट), उमाजी गायकवाड,अपक्ष (टेबल) व श्रीरंग सरवदे,अपक्ष (शिट्टी) चिन्ह आहे.