धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात महसुल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यांनी निषेधाचे एक निवेदन राज्याचे मुख्य सचिव, महसुल अपर मुख्य सचिव, संभाजीनगर विभागीय आयुक्त यांना दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्यावर तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप करुन समाज माध्यमातुन बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्यामार्फत हे निवेदन शासनाकडे देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार,तलाठी, मंडळ अधिकारी,महसुल कर्मचारी संघटना यांनी निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या नॉन क्रेमीलिअर प्रमाणपत्राची वस्तूस्तिथी वेगळी असताना त्यांची व त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे, जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करुन त्यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.अर्धवट चुकीची व दिशाभुल करणारी माहिती समाज माध्यमावर दिली जात आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाचे मानसिक खच्चीकरण होत असुन प्रशासकीय यंत्रणेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे अश्या प्रवृत्तीचा निषेध आहोत. जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या माध्यमातुन आरोप करुन बदनाम केले जात आहे.
निवेदनावर निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरुणा गायकवाड, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संतोष भोर, भुसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,तहसीलदार अभिजीत जगताप, धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे, लोहारा तहसीलदार के एम पाटील, उमरगा तहसीलदार गोविंद येरमे,वाशी तहसीलदार प्रकाश महेत्रे,परंडा तहसीलदार निलेश काकडे,कळंब तहसीलदार हेमंत ढोकले,नायब तहसीलदार प्रवीण जाधव, विजयकुमार वाडकर,विशाखा बलकवडे,महादेव शिंदे, सुषमा रेडके, यांच्यासह अनेक महसूल सहायक, अवल कारकून, तलाठी यांच्या सह्या आहेत. निवेदनासोबत शासन निर्णय सुद्धा जोडले आहेत.