धाराशिव – समय सारथी
एका 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 21 वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना घडली असुन यात आरोपीच्या आईने बलात्कारी मुलाची पाठराखण केल्याचे समोर आले आहे. मुलाने बलात्कार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने ही बाब पिडीत मुलीच्या कुटुंबापासुन लपवुन ठेवली व पिडीत मुलीला तीच्या घरी स्वतः नेहून सोडले. बलात्काराचे कृत्य लपवुन ठेवत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या आईने केला. पोलिसांनी वृंदावन कॉलनी, आनंद नगर, धाराशिव येथील आरोपी निश्चल मधुकर बोंदर याला अटक केली असुन न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
आरोपीने ओळखीचा फायदा घेत घरी खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, पिडीत मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्याने तिने ही घटना आईला सांगितली त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी निश्चलने त्याच्या रूममध्ये दुषकृत्य केल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने घटना उघड करण्याऐवजी पिडीत मुलीला तीच्या घरी नेहून सोडले व कोणास काहीही सांगितले नाही. एक प्रकारे मुलाच्या कृत्यावर आईने पांघरून घातले, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.
फिर्यादीनुसार निश्चलची आई सुनीता मधुकर बोंदर यांनी पीडितेच्या आईस फोन करुन मुलीला घरी खेळण्यासाठी पाठविण्यास सांगितले, त्यावरून मुलीला पाठवले. पिडीत मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यावर आरोपी निश्चल याने बेडरूममध्ये बलात्कार केल्याचे लक्षात आहे त्यानंतर आरोपीच्या आईने पिडीत मुलीला तीच्या घरी स्वतः नेहून सोडले व कोणाला काही सांगितले नाही, पीडीत मुलीने पोटात दुखत आल्याचे सांगितल्यावर प्रकार उघड झाला. मुलाने कृत्य केल्याचे त्याच्या आईने मान्य केले.
भारतीय न्याय संहिता 64,64(2)(1), 64(2),बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव हे करीत आहेत.