धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिसांनी अवैध वेश्या व्यवसाय विरोधात कारवाईची मोहीम उघडली असुन उमरगा येथील शांतादुर्गा हॉटेलवर छापा मारत एका पिडीत महिलेची सुटका करुन दोघांना अटक केली आहे. या रॅकेटमधील मालकीण फरार आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, उमरगा पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. धाराशिव येथील निसर्ग गारवा लॉजवरील सेक्स रॅकेट उघड करीत मुख्य आरोपी नितीन शेरखाने याला अटक केली. त्यानंतर आता उमरगा येथील रॅकेट उघड केले आहे.
आरोपी लॉजमालक आशा रामचंद्र तेलंग, मॅनेजर धनराज हरिश्चंद्र तेलंग,वय 42 वर्षे, रा न्यु बालाजी नगर उमरगा,रविंद्र महादेव महतो, वय 35 वर्षे, व्यवसाय वेटर (शांतादुर्गा लॉज) रा कमरवली थाना पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सर्वांनी संगणमत करुन स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले.
पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 370,370(अ)(2),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत उमरगा पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे.