धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज रॅकेटमध्ये धाराशिव पोलिसांना मोठे यश मिळाले असुन 46 लाख रुपयांच्या मुद्देमालासह तब्बल 35 जणांना आरोपी केले आहे. मुंबई येथील तस्कर संगीता गोळे हिच्या एका बँक खात्यावर 5 कोटी व घरात पाव किलो सोने सापडले आहे, तीचे कुटुंब ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. गोळेसह कणे, गंगणे, मुळे, ठाकुर व अन्य आरोपीनी ड्रग्जच्या विक्रीतुन जमावलेली संपत्ती व तिचा वापर कसा केला आहे याचा शोध पोलिस घेणार आहेत, असे त्यांनी कोर्टात नमुद केले आहे. ड्रग्ज विक्रीतून घेतलेली अवैध संपत्ती, गुंतवणूक व बँक खात्याचे व्यवहार आता पोलिसांच्या रडारवर आहे. ड्रग्जमधुन कमवलेली संपत्ती पोलीस तपासाअंती निष्पन्न झाल्यास ती शासन जमा करण्याची ठोस भुमिका घेणार आहेत. पोलीस हे बँक, महसूल, दुय्यम निबंधक व इतर विभागाना पत्र देऊन संपत्तीचे विवरण घेणार आहे, या शोध प्रक्रियेला काही महिने लागु शकतात. सध्या तपास सुरु असुन त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला गती येऊ शकते.

तुळजापूर येथे पोलिसांनी 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले त्यात 63 ग्रॅम वजनाच्या 89 पुड्या होत्या. पोलिसांनी मुंबई येथील 3 तस्करांसह तुळजापूर, सोलापूर, नळदुर्ग येथील ड्रग्ज पेडलर यांना आरोपी करीत अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीत 21 जण फरार असुन 4 आरोपी पोलिस कोठडीत आहेत, तर 10 जन जेलमध्ये आहेत. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस कोठडीतील 4 आरोपी असुन त्यात पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके (5 एप्रिल पर्यंत) व राहुल कदम – परमेश्वर (7 एप्रिल पर्यंत) व गजानन हंगरकर (8 एप्रिल पर्यंत) पोलिस कोठडीत आहेत. धाराशिव कारागृहात 10 आरोपी असुन त्यात अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे यांचा समावेश आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी संसद, विधीमंडळात आवाज उठवला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 3 वेळेस ड्रग्ज तस्करीबाबत लागणारी माहिती, टीप पोलिसांना दिली त्यामुळे तुळजापुरात वाढत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला. काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने ड्रग्ज तस्करीची कीड नष्ट होईल अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.