Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

ड्रग्ज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… दर्शन दौरा ठरणार की ठोस भुमिका घेणार.. मोठ्या अपेक्षा

समय सारथी by समय सारथी
April 25, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
879
VIEWS

परंडा येथे गुन्हा रद्दची ‘नामुष्की’ तर तुळजापूर तस्करीतील 21 ‘फरार’ आरोपी

धाराशिव – समय सारथी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत, त्यांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी,आखणी सुरु आहे.फडणवीस यांचा हा दौरा तुळजापूर येथील ड्रग्ज मुक्ती करुन नवीन सुरुवात करणारा ठरू शकतो. तुळजापूर व परंडा ड्रग्ज तस्करी यासह अन्य मुद्यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. परंडा येथे पकडलेले ड्रग्ज हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचे समोर आले असल्याने गुन्हा रद्द करण्याचा प्रस्ताव देण्याची नामुष्की ओढवली आहे तर तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचा मास्टरमाईंड असलेला ‘आका’ व ‘बोका’ कोण हे समोर आले नसुन 35 पैकी 21 आरोपी फरार आहेत. यात 4 आरोपी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी पर्यायाने भाजपशी निगडीत आहेत, मुख्यमंत्री ड्रग्ज स्वच्छता मोहीम राबवणार का ?

तुळजापूर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडले असुन पोलिसांनी अद्याप मकोका व संपत्ती जप्तीची कारवाई सुरु केलेली नाही. फडणवीस यांनी कारवाईच्या कडक सुचना दिल्या असुन कोणालाही सोडू नये असे आदेश दिले आहेत. तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करी, सेवन व व्यसन हा गंभीर सामाजिक मुद्दा बनला असुन तुळजापूर येथील नागरिक, व्यापारी, पुजारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटणार आहे व ड्रग्जचे वास्तव त्यांच्याकडे मांडणार आहे. मुख्यमंत्री येण्यापुर्वी फरार 21 आरोपी पैकी किती जणांना अटक केली जाते व आणखी किती नवीन आरोपी निष्पन्न होतात हे पाहावे लागेल. 

तुळजापुर येथे मुंबईवरून ड्रग्ज विक्री करणारी तस्कर महिला संगीता गोळे हिला व तिचा साथीदार संतोष खोत याला अटक केली असुन पती वैभव गोळे फरार आहे. संगीता हिच्या एका बँक खात्यावर 5 कोटी व घरात पाव किलो सोने सापडल्याने  गोळे परिवार तस्करीत असुन ते कोणाकडुन ड्रग्ज खरेदी करीत होते, त्यात कोणाचा पैसा गुंतला होता, गोळेच्या वरची मुंबईतील चैन तपासात समोर आलेली नाही. 

परंडा शहरात 19 जानेवारी 2024 मध्ये झालेल्या ड्रग्ज विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले 8.33 ग्रॅम हे ड्रग्ज नसुन कॅल्शियम क्लोराईड असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गुन्ह्याची फिर्याद गैरसमजुतीतुन दिल्याने गुन्हा रद्द करावा यासाठी ‘क’ समरी कोर्टात मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे 2 तरुणांना आरोपी बनवण्यात आले. इम्रान नसिर शेख व अन्वर उर्फ अण्णा अत्तार या 2 आरोपीना अटक केली त्यातील इम्रानने पोलिसांनी पकडलेले ड्रग्ज असल्याचे मान्य केले तर अण्णा अत्तारने ड्रग्ज इम्रानकडुन सेवनासाठी घेतल्याचे कबुल केले मात्र प्रयोगशाळेत ते कॅल्शियम क्लोराईड सापडले.

तत्कालीन सपोनि कविता मुसळे यांनी गस्ती करीता रवाना होणेपुर्वी पोकॉ मुलाणी यांना लॅपटॉप, प्रिंटरचे साहित्य, पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेणेबाबत सुचना केल्या, त्याप्रमाणे साहित्य घेऊन स्टेशन डायरीला नोंद करुन पेट्रोलिंगला गेल्या, जसे की त्यांना ड्रग्ज 100 टक्के सापडणार होते हे आधीच माहिती होते. अमली पदार्थ ओळखण्यासाठी फील्ड ड्रग्ज टेस्ट किट ही पोलिसांकडे असने व त्याचा वापर करणे अपेक्षित होते मात्र ती न करता थेट ड्रग्ज आहे म्हणुन का गुन्हा नोंद केला. आरोपीचा कॅल्शियम क्लोराईड पावडर जवळ ठेवण्याचा हेतू काय ? संवेदनशील प्रकरणात ड्रग्ज नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी एका होमगार्डकडे देणे, 7 महिन्याच्या अंतराने तपासाअंती अटक केली, त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन करण्याची कबुली दिली असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. 

पोलीस अधीक्षक जाधव यांचा ड्रग्ज मुक्तीचा ‘विडा’

धाराशिव जिल्ह्यातुन ड्रग्ज मुक्तीचा ‘विडा’उचललेल्या पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असुन फिर्यादीला समन्स काढण्यात आले आहे. 2 तरुण काही जणांच्या चुकीचा ‘बळी’ ठरले की अन्य काही झाले याची चौकशी होणे गरजेचे आहे. एसपी जाधव व त्यांच्या टीममुळे धाराशिव जिल्ह्यात प्रथमच ड्रग्ज तस्करी कागदावर आली व गुन्हा नोंद होऊन 35 जन आरोपी असलेले रॅकेट उघड झाले, त्याची व्याप्ती अजुन वाढतच आहे. 

Previous Post

याचिका – आमदार तानाजीराव सावंत यांच्या विरोधात राहुल मोटे यांची उच्च न्यायालयात याचिका 

Next Post

संपत्ती रडारवर, जप्तीची कारवाई होणार – आरोपीनी ड्रग्ज विक्रीतुन कमावले पैसे, बँक खाते व इतर गुंतवणुकीचा शोध

Related Posts

महाराष्ट्र

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025
महाराष्ट्र

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025
महाराष्ट्र

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
महाराष्ट्र

न्यायायीन कोठडी, तात्पुरता जामीन नाकारला – पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या अडचणीत वाढ, निलंबन

June 28, 2025
महाराष्ट्र

निलंबन – पोलीस निरीक्षक मारुती शेळके व लोखंडे पोलीस सेवेतून निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

June 27, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – आमदार धस यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट, एसआयटी चौकशीसाठी नोडल ऑफिसर नेमा

June 27, 2025
Next Post

संपत्ती रडारवर, जप्तीची कारवाई होणार - आरोपीनी ड्रग्ज विक्रीतुन कमावले पैसे, बँक खाते व इतर गुंतवणुकीचा शोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

माजी मंत्री तानाजीराव सावंत यांची प्रकृती बिघडली – आयसीयुमध्ये ऍडमिट, अँजिओप्लास्टी होणार

June 28, 2025

नळदुर्ग घरकुल घोटाळा – एका ठेकेदाराचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला, अटक कधी ? 3 कोटी 94 लाखांच्या अपहाराचा ठपका 

June 28, 2025

टॅक्स प्रॅक्टेशनर्स असोसिएशन धाराशिवच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडी

June 27, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp