धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी विनोद गंगणे यांना 6 जुन रोजी रात्री धाराशिव येथील कोर्ट परिसरातुन अटक केल्यानंतर 7 जुन रोजी कळंब कोर्टात हजर करण्यात आले, तामलवाडी पोलिसांनी विविध मुद्याच्या आधारे 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने 9 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील किरण कोळपे यांनी कोर्टात बाजु मांडली. गंगणे यांचा सेवनासोबत ड्रग्ज तस्करीचा कट व ड्रग्जसाठी प्रोत्साहन देणे असे कलम 29 वाढ करण्यात आले आहे. सुट्टी असल्याने कळंब कोर्टात आरोपीला हजर करण्यात आले.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यांचे स्वरूप मोठे असुन आरोपीचे ड्रग्ज तस्कर यांच्यासोबत थेट आर्थिक व्यवहार व संबंध होते.आरोपीने 12 लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले असुन आरोपी वापरत असलेला फोन त्याने पोलिसांना दिला नसुन त्याचा शोध घेऊन तपास करणे बाकी आहे अशी बाजु पोलीस व सरकारी वकील यांनी मांडली. आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची गरज नसुन त्याला विरोध केला. ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे, आरोपी गंगणे याने दुसऱ्याच्या खात्यावरून ड्रग्ज खरेदी करण्यासाठी रक्कम तस्कर यांना दिली त्यामुळे 9 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.