धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे यांचा भाचा आबासाहेब पवार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्या कोर्टात हजर केले असता कोर्टाने 23 मे पर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी माजी उपसभापती शरद जमदाडे याला व आबासाहेब पवार याला अटक केले असुन दोघांना 23 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पवार यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सूर्यवंशी यांनी मुद्देसुद युक्तिवाद केला तो ग्राह्य धरण्यात आला शिवाय तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी स्वतः हजर राहून पोलिस कोठडी गरजेचे असल्याचे सांगितले.
ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले असुन त्यातील 36 पैकी 26 आरोपी हे तस्कर गटात असुन 10 आरोपी हे सेवन गटात आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 17 जणांना अटक केली असुन 19 जन फरार आहेत. 36 पैकी 15 तस्कर व 2 सेवन गटातील आरोपी अटक असुन तस्कर गटातील 26 पैकी 11 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत.
जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सुर्यवंशी यांनी कोर्टात बाजु मांडताना सांगितले की, अटक आरोपी याचे ड्रग्ज तस्करासोबत थेट आर्थिक व्यवहार झाले असुन कॉल डिटेल संभाषण सापडले आहे. आरोपीने आणखी कोणासोबत आर्थिक व्यवहार केले हे निष्पन्न करणे आहे. कॉल डिटेल व इतर तांत्रिक माहिती तपासणे आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार आहे त्यामुळे आरोपी व त्याचा ड्रग्ज गुन्ह्यातील सहभाग, इतर आरोपी सोबतचे संबंध तपासणे आहे. त्याने ते ड्रग्ज कशासाठी घेतले होते याचा तपास करणे बाकी आहे. आरोपी फरार आरोपींच्या संपर्क असु शकतो त्यांचा ठावठिकाणा कळू शकतो. प्राथमिक तपासानुसार चार्जशीट दाखल केले आहे, ते ड्रग्ज कशासाठी वापर होता हे तपासणे आहे. प्राथमिक पुराव्याच्या आधारे दोषारोप पत्र दाखल केले आहे त्यात अटक आरोपी यांच्या पुरता मर्यादित तपास झालेला आहे इतर आरोपींचा सहभाग व तपास करणे बाकी आहे त्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सुर्यवंशी यांनी सादर केला.
तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी कोर्टात बाजु मांडताना सांगितले की, 14 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे त्यात 19 आरोपी फरार असुन 17 अटकेत आहेत. अटक आरोपीचे आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल सापडले आहेत. अटक आरोपीचा मोबाईल जप्त करणे, बँक स्टेटमेंट व इतर माहिती हस्तगत करणे आहे. अटक आरोपी व फरार आरोपी याचा तपास करणे बाकी आहे. फरार आरोपीचा ठावठिकाणा माहिती असुन शकतो. सविस्तर तपास करण्यासाठी पोलिस कोठडी मागितली.
फरार आरोपी (19) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 19 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.