धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी राजू उर्फ पिंटू सुर्वे या आरोपीला सोलापूर येथून अटक करुन धाराशिव येथील कोर्टात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली, तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी तपासावर माहिती दिली.पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी द्यावी अशी विनंती कोर्टाला केली होती.
पिंटू सुर्वे याच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीचे सोलापूर रॅकेट उघड होण्याची शक्यता असुन तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात आरोपींची संख्या 37 वरून 38 वर गेली आहे. पोलिसाचा तपास सुरु आहे. सुर्वे हा गेली काही दिवसापासुन पोलिसांना हवा होता, त्याचा शोध सुरु होता. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पिंटू सुर्वे व मुंबई येथील अतुल अग्रवाल यांची नावे पोलिसांकडे आरोपी व साक्षीदार यांनी दिलेल्या जबाबात असल्याचे म्हणटले होते, त्यावेळी त्यांनी दोषारोप पत्र पत्रकार परिषदेत दाखविले होते. पोलिसांनी या दोघांना आरोपी केले नसल्याचा आरोप केला होता, त्यातील सुर्वे याला अटक केली आहे.
ड्रग्ज तस्करीत आरोपींची संख्या आता 38 झाली असुन 21 जण अटकेत असुन 16 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची यानिमित्ताने शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 15 आरोपींची जामीन कोर्टाने नाकारली असुन 6 आरोपींचे अर्ज प्रलंबित आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे बाजु मांडत आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (16) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 16 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत