धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अटक आरोपी शुभम नेप्ते याला धाराशिव येथील कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ड्रग्ज तस्करीच्या तपासात नेप्ते याचा सहभाग व सबळ पुरावे सापडल्याने पोलिसांनी त्याला आरोपी केले असुन आरोपींची संख्या 37 झाली आहे. नेप्ते हा ड्रग्ज तस्करी करीत असल्याचे समोर आले असुन अटक व फरार आरोपी सोबत त्याच्या आर्थिक व्यवहार व संभाषणाचे पुरावे मिळाले आहेत. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख व तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात बाजु मांडली. नेप्ते याला अटक केल्याने पोलिस तपास सुरु असुन आणखी काही जन रडारवर असल्याचे दिसते. ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी असुन 19 जन अटकेत आहेत तर 18 जन फरार आहेत, त्याचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत.
आरोपी शुभम नेप्ते याचे अमित अरगडे, नानासाहेब खुराडे व इतर आरोपीशी आर्थिक व्यवहार, संभाषण झाल्याचे पुरावे मिळाले आहेत, ड्रग्ज तस्करीत याचा सहभाग आहे असे समोर आले आहे. याच्याकडून अटक आरोपी व फरार विरोधात सुद्धा पुरावे मिळू शकतील त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. ड्रग्ज गुन्हा व तपासाची व्याप्ती मोठी आहे, त्याच्याकडुन आर्थिक व्यवहाराचे इतर पुरावे, मोबाईल हस्तगत करणे आहे. नेप्तेच्या सहभागाबाबत इतर आरोपी व साक्षीदार यांनी जबाब दिले असल्याची बाजु ऍड देशमुख व सपोनि ठाकुर यांनी मांडली. सादर केलेला युक्तीवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेप्ते हा गेली 3 महिने पासुन चौकशीत सहकार्य केले जेव्हा बोलवले तेव्हा आला, त्याच्या विरोधात पुरावे नाहीत, तपास होऊन चार्जशीट दाखल झाले आहे. बँक स्टेटमेंट आहे, पुरावा नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
पोलीस हे पुरावा व वस्तुस्तिथीनुसार तपास करीत आहेत, नेप्ते याला चौकशीला बोलावले, अडकवयाचे असते तर तेव्हाच आरोपी केले असते मात्र आम्हाला तपासात पर्याप्त पुरावे व क्लिप मिळाली. व्यवहार कुठे कुठे केले, सबळ पुरावा मिळाला तरच आरोपी केले आहे असा युक्तिवाद ऍड महेंद्र देशमुख यांनी मांडला.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.