धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात धाराशिव पोलिसांनी सेवन गटातील आरोपी अभिजीत अमृतराव या आरोपीला अटक केली आहे, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फरार आरोपी अभिजीत अमृतराव याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 13 आरोपी फरार आहेत तर 3 जणांना जामीन मिळाला असुन 22 आरोपी हे धाराशिव येथील जिल्हा कारागृहात आहेत. पोलिसांनी 10 हजार 744 पानाच्या दोषारोप पत्रात तपासाअंती 38 पैकी 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात दाखवले आहेत. 22 जुन रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली त्यानंतर 18 जुलै रोजी अभिजीत अमृतराव या आरोपीला अटक केली.
फरार आरोपी (13) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 15 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.