धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांवर सुरुवातीपासुनच राजकीय दबाव असल्याचे दिसुन आले आहे, पोलिसांनी धाडसी कारवाई केली असली तरी तपास कसा व कुठवर करावा याला ‘एका’ नेतृत्वाने मर्यादा घालुन दिल्या गेल्याचे सूत्रांची माहिती आहे. मुंबई, सोलापूरसह तुळजापूर येथील काही जणांची नावे आरोपी, साक्षीदार यांच्या जबाबात येऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यातील अनेक जन रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी मुंबई येथील तस्कर संतोष खोत याला 27 फेब्रुवारी रोजी अटक केली, त्यात त्याने पोलिसांना जो जबाब दिला आहे तो दोषारोपपत्रासोबत जोडला आहे. त्यानुसार वैभव गोळे हा मुंबई गेली अनेक वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी व गांजा विक्री करायचा. विरार येथील अतुल अग्रवाल याच्याकडुन तो ड्रग्ज खरेदी करायचा. वैभव गोळे याच्या बायकोला पोलिसांनी 22 फेब्रुवारी रोजी अटक केली त्यावेळी तिने पोलिसांना सांगितले की तिचा पती 2017 पासुन ड्रग्ज तस्करी करायचा, मी ही त्यात सहभागी झाले. आम्ही विरार येथील अतुल अग्रवाल या आरोपीकडुन ड्रग्ज घ्यायचे, या दोघांनी अग्रवालचा मोबाईल नंबर दिला असुन तो सध्याही सुरु आहे.
सोलापूर व मुंबई अश्या 2 लिंक तुळजापूर ड्रग्ज तस्करीत असुन सोलापूर येथील पिट्टा सुर्वे याचे नाव आरोपी गजानन हंगरगेकर, साक्षीदार हर्ष सोंजी व ओंकार भिसे यांच्या जबाबात आले आहे. सोलापूर येथील पिट्टा सुर्वे हा प्रसाद कदम याचा मित्र सागर कदम याचा पाहुणा असुन ते दोघे सोलापूरहुन ड्रग्ज आणुन तुळजापूर येथे विकायचे. या 3 जणांनी त्यांच्या जबाबात अनेक लोकांनी नावे व काही जणांचे मोबाईल नंबर दिले आहेत, 1 महिनापेक्षा जास्त काळ झाला असुन त्यातील काही जणांना अभय दिल्याचे दिसते.
विशाल झाडपीडे याने पोलिसांना 2 एप्रिल रोजी दिलेल्या जबाबात त्याने गजानन हंगरगेकर, प्रसाद कदम व अमित आरगडे या 3 आरोपीकडुन तब्ब्ल 14 वेळा पेक्षा अधिक ड्रग्ज खरेदी केली असुन त्याला पोलिसांनी ‘साक्षीदार’ बनवले आहे, त्यात त्याने अनेकांची नावे सांगत ड्रग्जची ‘पोलखोल’ केली आहे. हर्ष सोंजी याने त्याच्या जबाबात ड्रग्ज विक्री करणाऱ्याची नावे व मोबाईल नंबर सांगितली आहे, त्यात सोलापूर येथील पिट्टा व तुळजापूर येथील स्थानिकांची नावे आहेत. सुरज म्हस्के याने 3 एप्रिल रोजी दिलेल्या जबाबात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची नावे सांगितली आहेत मात्र त्यादृष्टीने तपास, चौकशी झाली नसल्याचे दोषारोपपत्रावरून दिसते.
मुंबई येथील संगीता गोळे याच्या पुढचे नेटवर्क कोन आहे, माल कोन पुरविते. जिल्ह्यात तालुक्यात कसे पसरवले. तुम्ही खरेच खासदार असाल तर ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाऊन ‘शोधनिबंध’ लिहत बसावे व ते नेटवर्क शोधून काढावे असे ‘ओपन चॅलेंज’ आरोपी विनोद पिटू गंगणे यांचे बंधु विजय गंगणे यांनी पत्रकार परिषदेत दिले होते, ओमराजे यांनी हे शोधून काढले तरच मी म्हणेल ‘मेरे अंगने मै तुम्हारा क्या काम है.
मुंबई लिंक शोधा या चॅलेंजमधील ‘उत्तर’ ओमराजे यांनी पोलिसांनी केलेल्या तपास व चार्जशीटमधुन शोधून काढले आहे. मुंबई, सोलापूर, तुळजापूर येथील आरोपी नावे मोबाईल नंबरसह जबाबात मांडली असुन आता पोलिस काय भुमिका घेणार हे पाहावे लागेल. विजय गंगणे यांनी दिलेल्या ‘चॅलेंज’ प्रमाणे खासदार ओमराजे यांनी नावे जाहीर केली असुन पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.