धाराशिव – समय सारथीपिकविम्याची नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत निकषात केंद्र सरकारने जाचक अटींचे परिपत्रक काढले आहे हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे अशी मागणी करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची दिल्ली येथे भेट घेतली व मागणी केली आहे.
केंद्र सरकारचे 30 एप्रिल 2024 चे शेतकरी विरोधी अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे जेणेकरून धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, परिपत्रक रद्द करावे अशी मागणी खासदार ओमराजे यांनी केली आहे.