धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 व 6 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे रात्री 8 वाजता मुक्कामी येणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी मंगळवारी सकाळी 10 वाजता तुळजभवानी मातेच दर्शन घेऊन आरती करणार आहेत. दुपारी 12 शिंगीली येथील विश्राम गृह येथे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा व परंडा या 4 ही विधानसभा मतदार संघाचा विधानसभा निहाय आढावा घेतील त्यानंतर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी हजर असणार असुन विधानसभा अनुषंगाने इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील. राज ठाकरे यांचा वरीलप्रमाणे संभाव्य दौरा असुन त्याचे नियोजन सुरु आहे त्यामुळे वेळेत व कार्यक्रमात काही बदल होऊ शकतात.