धाराशिव – समय सारथी
भाजप मित्र पक्ष आहे मात्र शिवसेना पक्षावर कुरघोडी करत आहे, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पालकमंत्री यांचे पाय मुबंईत जाऊन धरले व युतीची बोलणी केली मात्र बोलले एक वागले एक, धोका दिला, शिवसेनेला फसवले. पहाटे 3 पर्यंत बोलणी सुरु ठेवली मात्र नंतर युती मोडली. नगराध्यक्षपद उमेदवार देऊ दिला नाही. फसवून जिंकलेली निवडणुक आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या डोक्यात विजयाची हवा शिरली आहे. सावंत यांनी नेतृत्व हाती घ्यावे नाही तर राणाजगजीतसिंह पाटील हे पक्ष संपवल्याशिवाय राहणार नाहीत, आता त्यांनी फसवू नये यासाठी सावंत यांनी निर्णय घ्यावा व आदेश द्यावा आम्ही लढू असे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके म्हणाले. कळंब येथे शिवसेना नावाला आहे मात्र ते भाजपचे काम करीत आहेत. भुम, परंडा येथे सगळ्यांनी एकत्र येत युती केली असे म्हणाले.
आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत म्हणाले की, आमचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके सांगतात की, आम्हाला फसवले. ज्या गावच्या बोरी त्याचं गावच्या बाभळी आहेत, 2017 साली धाराशिव नगर परिषदेची सत्ता उलटून टाकून सत्ता परिवर्तन केले, मकरंद राजे निंबाळकर यांना अध्यक्ष केले त्यावेळी भाजप उमेदवार रिंगणात होते मात्र शिवसेना जिंकली, बहुमत नसताना शिवसेनेचा उपाध्यक्ष केला. 40 वर्षाची त्यांची सत्ता उलटून टाकत नगराध्यक्ष केला.
पक्षातील काही नेत्यांनी आपली औकात नसताना पंगा घेण्याचा व बाजुला करण्याचा प्रयत्न केला. त्याची झळ नेत्यांना बसली नाही, सामान्य शिवसैनिकांना बसली. पाय ठेवायला जागा ठेवली नाही, ही सुद्धा नियती आहे. बोलवत घुमवत ठेवणे ही एक चाणक्य निती असते, तुम्ही त्याला बळी का पडलात. पक्ष प्रमुखांनी धाराशिवमध्ये आदेश दिला असता तर सेनेचे अध्यक्ष केला असता, नसता तोंड दाखवले नसते. औकात लागते, मनगटात दम व ताकत लागते असे ते म्हणाले. समोरच्या नेत्यांची पावले ओळखता आली पाहिजेत असे म्हणत सावंत यांनी कानमंत्र दिला.
धाराशिव नगर परिषदेत पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्हाला खेळवत ठेवले, तुम्ही सगळे मुर्ख कसे निघाले. मुंबईल्या नेत्यापासुन गल्लीतल्या शाखा प्रमुख पर्यंत तुम्ही मुर्ख का निघाले की तुम्ही जाणीवपूर्वक मुर्खपणा स्वीकारला असा सवाल केला.मी असतो तर युती पहिल्याच दिवशी धुडकावली असती व सर्व जागेवर उमेदवार उभे केले असते. यश,अपयश आम्ही नंतर बघतो. लढणे हे शिवसैनिकांचा गुण व बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे.सत्तेसाठी आम्ही नाही, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण अशी शिकवन आहे मात्र 80 टक्केचा विचार करीत नाही. फक्त 20 टक्के मागे लागले, हे मला मान्य नाही असे सावंत म्हणाले.
मतदानापुर्वी 2 दिवस आधी साळुंखे यांचा फोन आला की साहेब धाराशिवमध्ये लक्ष घाला. मात्र मला नेत्यांनी धाराशिवमध्ये लक्ष घाला असा आदेश दिला नाही. तुमचा निर्णय पुर्ण चुकला आहे. डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही, सामोरे जा नंतर पाहु असे म्हणालो. शिवसेनेचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष असा पायंडा पाडला होता, विद्यमान दोन्ही पदे असल्याने ही दोन्ही शिवसेनेकडे ठेवुन इतर बोलणी करायला हवी होती मात्र इथेच चुकले. जुनी भाजपमधील कोण आहे का तिथे पहा. ओमराजे यांना 2019 चालु खासदार यांचे तिकीट देऊन निवडुन आणले व ह्यांना पराभवची माती चारली तेव्हा यांच्या लक्षात आले की आता युतीशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.












