धाराशिव – समय सारथी
प्रभू श्री रामाचे शब्द खरे होते आणि खरेच आहेत, आता जनताच न्याय करेल, लढेंगे और जितंगे भी अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. सभापती नार्वेकर यांनी निकाल जाहीर केल्यावर आमदार कैलास पाटील यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ व काही टेक्स्ट पोस्ट करुन या निकालावर प्रतिक्रिया देत जनतेच्या दरबारात आपण लढू व जनताच आपल्याला न्याय देईल असे सांगितले.
प्रभू रामांनी सांगितले होते की कलयुग येईल आणि सत्य गोष्टी दडवल्या जातील आणि चुकीची लोक सत्ता करतील व त्यांचेच खरे मानले जाईल. वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा मान सन्मान केला जाईल शिवाय त्यांना समाजात स्थान मिळेल अश्या स्वरूपाचा त्या विडिओ मध्ये आशय असुन त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व भाजप यांना टोला मारला आहे.
कलयुगात धर्म कर्म मानले जाणार नाही त्यांना लाज असणार नाही. राजा आणि प्रजा यात लढाई होईल, प्रत्येक पावलावर मनमानी केली जाईल, ज्याच्या हातात लाठी तोच राज्य करेल अशी स्तिथी येईल. मन व धन हे काळे असेल, चोर धनवान होतील व भक्त निर्धन होतील. लोभी व भोगी लोक म्हणतील त्याप्रमाणे वागतील. प्रभू रामांनी जसे सांगितले होते तसेच आता सध्या होत आहे. त्यांनी सांगितलेली स्थिती ही आजच्या राजकीय स्तिथी व निकालाला लागु पडत आहे असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे.
आमदार कैलास पाटील हे सत्ता परिवर्तन वेळी गुजरात बॉर्डरवरून परत आले होते, ज्यावेळी त्यांना कळले की काही तरी घात होतोय. आमदार कैलास पाटील हे निकालात पात्र ठरले आहेत.