धाराशिव – समय सारथी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय उमरगा लोहारा मतदार संघांचे आमदार ज्ञानराज चौघुले यांनी जाहीर कार्यक्रमात पुढील मंत्रीमंडळात शिक्षण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था ही योग्य पद्धतीने चालत नसून त्या शिक्षण व्यवस्थेत बदल करावी लागतील, मी या अगोदरही विधानसभेच्या पटलावर शिक्षण व्यवस्थेत संदर्भात आपले मत व्यक्त केले.
शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्षाचा रोड मॅप तयार करायला हवा भविष्यात मला जर त्याचे अधिकार मिळाले तर निश्चितच मी करेल अशा शब्दात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शिक्षण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ज्ञानराज चौगुले हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदार संघांचे गेली तीन टर्म आमदार राहिले आहेत. बंडाच्या भूमिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर ज्ञानराज चौगुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे ते मुख्यमंत्र्याची विश्वासू मानले जातात, आता मुख्यमंत्र्याची विश्वासू असलेल्या ज्ञानराज चौघुलेनी शिक्षण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय गोठात चांगलीच खळबळ माजली आहे.
उमरगा शहरातील शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्ञानराज चौघुले ने शिक्षक व विद्यार्थ्यांसमोरच आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.