धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची प्रा शिवाजीराव सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या दोघांनी जवळपास अर्धा तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये बंद दरवाज्या आड चर्चा केली. मंत्री सरनाईक यांनी प्रा सावंत यांना भेटीसाठी बोलावले होते, त्यात काय चर्चा झाली हे कळू शकले नाही.
एकीकडे माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत व प्रा शिवाजीराव सावंत यांच्यात राजकीय दुरावा आहे, प्रा तानाजीराव सावंत हे आमदार झाल्यापासून धाराशिव व मतदार संघात आले नाहीत, ते पालकमंत्री यांच्या बैठकीला आले नाहीत तर दुसरीकडे प्रा शिवाजीराव सावंत यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रा शिवाजीराव सावंत हे काल सोलापूरला भेटले नाहीत, त्यामुळे ते इथे भेटायला आले असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.