धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 19 व 20 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असुन या 2 दिवसांच्या काळात अनेक कार्यक्रमांना ते उपस्थितीत राहून विकास कामांचे उदघाटन करणार आहेत. बसची स्तिथी, प्रवासात येणाऱ्या अडचणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व आगामी काळात काही बदल करण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव हा प्रवास बसने करणार आहेत, सरनाईक यांनी नुकताच 2 दिवसांचा कर्नाटक राज्याचा दौरा करुन तेथील परिवहन सेवेचा आढावा घेत तिथल्या सुविधा, यंत्रणा याची माहिती घेतली होती, त्याधर्तीवर राज्यात आगामी काळात बदल केले जाऊ शकतात.
परिवहन मंत्री 19 फेब्रुवारीरोजी सायंकाळी 4 वाजता वाजता सोलापूर आगाराची पाहणी करतील व त्यानंतर 5 वाजता सोलापूर धाराशिव बसने येतील. धाराशिव व कळंब येथील शिवजयंती महोत्सवाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर कळंब आगारास भेट देऊन रात्री सोलापूर येथे मुक्काम करतील. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.45 वाजता सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजाभवानी मंदीर याची पुरातत्व विभागाच्या अधिकारी सोबत पाहणी करतील. त्यानंतर 10 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान अंतर्गत तुळजाभवानी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, राणी लक्ष्मीबाई उद्यान लोकार्पण करतील. त्यानंतर धाराशिव येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ कार्यक्रम उपस्थितीत राहतील.नळदुर्ग येथील किल्ला पाहणी व उपजिल्हा रुग्णालय लोकार्पणसह अन्य विकास कामांचे लोकार्पण, उदघाटन करतील.