धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 12 जुन रोजी गुरुवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. डीपीडीसी निधी स्थगिती, राने यांचे वक्तव्य, तुळजापूर ड्रग्जसह राजकीय मुद्यावरून राजकीय वातावरण चांगले तापणार आहे.
मंत्री सरनाईक हे 12 जुन रोजी सकाळी 8 वाजता हॉटेल बालाजी सरोवर प्रिमीयम, सोलापूर शहर येथून खाजगी वाहनाने नळदुर्ग येथे येऊन नळदुर्ग किल्ला पाहणी करतील. त्यानंतर 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी कळंब येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील व त्यानंतर दुपारी 2 वाजता बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथे स्व संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतील.
