धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिर मधील उपदेवतांच्या देवतांच्या मूर्ती मंदिर संस्थान प्रशासनाने थेट मंदिरच्या बाहेर हलविल्यामुळे हिंदुराष्ट्र सेना आक्रमक झाली होती, या विषयी मंदीर संस्थानने 9 मे रोजी बैठकीचे आयोजन केले असुन त्याला महंत, पुजारी मंडळाचे अध्यक्ष उपस्थितीत राहणार आहेत.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेश केल्याप्रमाणे 30 एप्रिल अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर विधी आण होम करुन निंबाळकर दरवाज्या शेजारील उपदेवतांची उत्थापना करण्यात आली, त्यानंतर प्रतिष्ठापना होईपर्यंत महंत तुकोजीचुवा गुरु बजाजीबुवा यांच्या अभिप्रायानुसार पापनाश तीर्थ येथील इंद्रवरदायीनी मंदिर परिसरात नित्य पूजा अर्चा करणेकरिता ठेवण्यात आल्या आहेत असे पत्रात नमुद केले आहे.
याबाबत तक्रार दिल्यानंतर मंदीर व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळगे यांच्या अध्यक्षतेखाली 9 मे रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर तहसीलदार कार्यालय येथे बैठक होणार आहे. महंत तुकोजीबुवा गुरु बजाजीबुवा, महंत चिलोजीसुवा गुरु हमरोजीबुवा, महंत मावजीनाथ बाबा, दशावचार मठ, महंत ईच्छागिरी महाराज, इच्छागिरी मठ यासह उपाध्ये, भोपे व पाळीकर या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, सुनित गणपतराव पाठक, सरकारी उपाध्ये व परिक्षीत सुहासराव साळुंखे, जिल्हा प्रमुख हिंदुराष्ट्र सेना यांना निमंत्रित केले आहे.