धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणाबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे हे स्वतः उद्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन मराठा संघटना व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली आहे
इंपेरीकल डेटा अनुषंगाने तयारी व इतर माहिती कशी जमा करायची यासाठी जिल्हाधिकारी ओम्बासे उद्या बैठक घेणार आहेत. यात मराठा संघटना यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या सुचना विचारात घेतल्या जाणार आहेत. मराठा आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा महत्वाचा असुन त्यासाठी मागासवर्ग आयोगाने काम सुरु केले आहे तर फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना VC मध्ये महत्वाचे निर्देश दिले असुन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी हे मराठा संघटना व पदाधिकारी यांची विशेष बैठक घेणार आहेत.