धाराशिव – समय सारथी
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक, डॉक्टरांनी आक्रमक होत राज्य सरकारला 6 दिवसांचा अल्टीमेटम दिला असुन काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक यांचे पगार गेल्या 4 महिन्यापासून झाले नसुन जवळपास 50 टक्के प्राध्यापक व डॉक्टर यांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी धाराशिव येथे बैठक घेतली मात्र त्यात त्यांनी तोडगा काढला नाही. रिक्त पदे भरावी व पगार तात्काळ करावी यां मागणीसाठी प्राध्यापक आक्रमक झाले आहेत.
येत्या 6 दिवसात पगारी झाल्या नाहीत तर काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकार समोरील डोकेदुखी वाढणार आहे. एकीकडे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णसेवा औषधे व डॉक्टर नसल्याने कोलमडली असताना हा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या प्राध्यापकांनी 10 ऑक्टोबरपासुन काम बंद आंदोलनाचा इशारा अधिष्ठाता यांना निवेदन देऊन दिला आहे. दर महिन्याच्या 5 तारखेपुर्वी नियमित पगार करावी अशी प्रमुख मागणी आहे.