धाराशिव – समय सारथी
एका 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी निश्चल मधुकर बोंदर याला धाराशिव येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्याची रवानगी धाराशिव येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. 7 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यावर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करीत वाढीव पोलिस कोठडी मागितली मात्र कोर्टाने ती नाकारत आरोपी निश्चलची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली.
आरोपीने ओळखीचा फायदा घेत घरी खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, मुलीला रक्तस्त्राव व पोटदुखीचा त्रास झाल्याने तिने ही घटना आईला सांगितली त्यानंतर हा प्रकार उघड झाला. फिर्यादीनुसार निश्चलची आई सुनीता मधुकर बोंदर यांनी पीडितेच्या आईस फोन करुन मुलीला घरी खेळण्यासाठी पाठविण्यास सांगितले, त्यावरून मुलीला पाठवले, त्यानंतर त्यांनी मुलीला घरी आणुन सोडले. पिडीत मुलगी घरी आल्यावर तिला रक्तस्त्राव झाल्याने त्रास होऊ लागला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करुन गुन्हा नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहिता 64,64(2)(1), 64(2),बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 नुसार आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश जाधव हे करीत आहेत.