धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा ताफा मराठा आरक्षण आंदोलकांनी कौडगाव येथे आडवीला, त्यावेळी मराठा आंदोलकांनी आरक्षण मिळत नसल्याने व गुन्हे मागे घेतले जात नसल्याने रोश व्यक्त केला. गुन्हे मागे घेता म्हणालात व मागे घेतले नाहीत उलट 20 तारखेच्या आंदोलनाच्या नोटीसा येत आहेत असे आंदोलकांनी सांगितले.
मराठा आमदार गप्प बसला असे नाही फक्त आम्ही तुम्हाला काय करीत आहोत हे सांगत नाहीत इतकाच त्यात फरक आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने करता आम्ही आमच्या मार्गाने करतोय, प्रत्येक आमदार प्रयत्न करतोय, तो बोलत नाही याचा अर्थ तो गप्प बसला असे नाही.मराठा आमदार यांना भावना नाहीत का ? तुम्ही बोलता म्हणून तुमच्या भावना कळतात आम्ही बोलत नाहीत.
आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका, मराठा आरक्षणाचा लढा आपल्याला सुरू ठेवायचा आहे. जीवाचे बलीदान देऊ नका.करिअर बरबाद करायचे नाही, शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा सल्लाही मंत्री सावंत यांनी दिला. यावेळी आमदार राजाभाऊ राऊत उपस्थितीत होते.