धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात आढळल्या मराठा कुणबी अश्या 1 हजार 572 नोंदी सापडल्या असुन त्या आधारे 1 हजार 733 प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी प्रमाणपत्रसाठी अर्ज दाखल करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
7 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार मराठा-कुणबी,कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तीना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्हयातील विविध शासकीय विभागाच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 22 डिसेंबरपर्यंत 1 हजार 572 नोंदी आढळून आले आहेत.