धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांनी धाराशिवच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड करीत संताप व्यक्त केला आहे, मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसतात त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला
हातलाई देवी तलावात मराठा समाजाचे तरुणांनी जलसमाधी आंदोलन सुरू असताना वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाकडे फिरकत नसल्याने मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले. आंदोलन मागण्या संदर्भात चर्चा करत असताना अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली यामुळे संतप्त तरुणांनी कार्यालयातील ट्यूब व दरवाजावर तोडफोड करत मोठा गोंधळ घातला. जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. या आंदोलकांनी परिसरात घोषणाबाजी केली.