धाराशिव – समय सारथी
भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे अश्या आशयाचे बॅनर धाराशिव शहरात लागले असुन 5 व 6 ऑगस्ट असे 2 दिवस राज ठाकरे यांचा धाराशिव दौरा आहे, धाराशिवनगरीमध्ये राज ठाकरे यांच्या आगमनार्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले असून त्यावरती
भावी मुख्यमंत्री,हिंदू जननायक असा उल्लेख केला आहे. मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे व शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 ऑगस्ट रोजी रात्री मुक्कामी येणार आहेत. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते धाराशिव येथे येतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते क्रेनच्या सहाय्याने भव्य स्वागत करुन हार घातला जाईल. पुष्पकपार्क येथे विधानसभा आढावा बैठक घेण्यात येईल.
6 ऑगस्ट रोजी मंगळवारी जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा व परंडा या 4 ही विधानसभा मतदार संघाचा विधानसभा निहाय आढावा घेतील त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी हजर असणार असुन विधानसभा अनुषंगाने इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील.